गली बॉय फेम रॅपर धर्मेश परमार उर्फ MC तोडफो़ड याचे निधन झाले आहे. धर्मेशच्या मृत्यूची बातमी त्याच्या ‘स्वदेशी मूव्हमेंट’ या बँडने सोशल मीडियावर दिली आहे. ‘गली बॉय’चा मुख्य अभिनेता रणवीर सिंगने धर्मेशच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
धर्मेशच्या इन्स्टा स्टोरीवर तुटलेल्या हृदयाचा इमोजी जोडला आहे.दिग्दर्शक झोया अख्तर आणि को-स्टार सिद्धांत चतुर्वेदी यांनीही सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.धर्मेश अवघ्या 24 वर्षांचा होता. त्याच्या अकाली निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘गली बॉय’मधील इंडिया 91 या साउंडट्रॅकद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.


