कोरोनाबाधितांसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या गटातील गावातील शाळा, मंगल कार्यालयांमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करावे, असे आदेश जि.प. स्थायी समितीच्या सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या गटातील मोठ्या गावांमध्ये रुग्ण संख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायत व स्थानिकांना विश्वासात घेऊन शाळा, मंगल कार्यालये किंवा उपलब्ध असलेल्या जागेमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करावे, सदस्यांनी गावा-गावांत जाऊन लसीकरण, उपचारासंदर्भात तसेच कोरोना चाचणीसंदर्भात जनजागृती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अनेक गावांमध्ये दुकाने, टपऱ्या या बिनधास्तपणे सुरु राहतात. आणि त्या ठिकाणी नागरिक गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे त्यामुळे संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवकांकडे तक्रारी कराव्यात आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत,