शनिवारी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.24 तासांच्या आत गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.आज गुजरात भाजपाच्या दीर्घकाळ चाललेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र रजनीकांत पटेल यांची मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड करण्यात आली.केंद्रीय मंत्री आणि पक्ष निरीक्षक नरेंद्र सिंह तोमर यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर त्यांच्या नावाची घोषणा केली.नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोमवारी म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यासोबतच अहमदाबाद महानगर पालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. भूपेंद्र पटेल यांना केवळ आनंदीबेनच्या सांगण्यावरून घाटलोदिया सीटवरून तिकीट देण्यात आले. पटेल यांनी ही निवडणूक 80 हजारांहून अधिक मतांनी जिंकली.संपूर्ण गुजरातमध्ये २०१७च्या निवडणुकांमध्ये हा सर्वाधिक मतांचा फरक होता.