द्वारकाच्या सलयामध्ये गुजरात पोलिसांनी तब्बल 350 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहेत .याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.हे ड्रग्ज पाकिस्तान मधून समुद्रमार्गे गुजरातला आणण्यात आले आहेत.या जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात 350 कोटी रुपये किंमत आहे.
गुजरात पोलिसांनी सांगितले की, ‘या ऑपरेशनसाठी पोलिसांच्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. सलीम अलीकारा आणि शेहजाद अशा दोन आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून पोलिसांनी ड्रग्जची पाकिटं जप्त केली. त्यानंतर आरोपी सलीमच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी आखमी ड्रग्जची पाकिटं जप्त केली. आतापर्यंत पोलिसांनी जवळपास 50 किलो मेफेड्रोन आणि 16 किलो हेरॉईन जप्त केले आहे.
पोलिसांनी अटक केलेला शेहजाद (44 वर्षे) हा मुंब्र्याचा रहिवासी आहे.खंभालिया याठिकाणी एका गेस्ट हाऊसमध्ये तो थांबला होता.बसची वाट पाहत असताना पोलिसांनी देवभूमी द्वारकामधून त्याला अटक केली. त्यांच्याकडे असलेल्या ड्रग्जची पाकिटं पोलिसांनी जप्त केली.