एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.गुणरत्न सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.मा.शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्य केल्यामुळे सदावर्तेंवर कारवाई केली जात आहे..न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिस मुंबईतील ऑर्थर जेलकडे घेऊन रवाना झाले आहेत.
सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर न्यायालयात दाखल झाले होते. त्यांचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज देखील केला आहे. पण कोल्हापूर पोलिस सदावर्तेंना घेऊन मुंबईच्या ऑर्थर रोड जेलकडे रवाना झाले आहेत.


