गोवा:उत्तर गोव्याच्या पोलिसांची आता परदेशी पर्यटकांवर नजर

0
130

उत्तर गोव्याच्या पोलिसांनी आता परदेशी पर्यटकांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. परदेशी पर्यटक त्यांच्या व्हिसा संपून गेला तरी गोव्यामध्ये राहताना दिसून येत आहे.तसेच अशा पर्यटकांचे गुन्हेगारीतही हात असण्याचही प्रकार वाढत चालले आहेत.अशा पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.परदेशी पर्यटनची कागदपत्रे तपासण्यात येतील आणि जर ती सर्व अटीत बसणारी नसतील तर अशा परदेशी पर्यटकांवर कायदेशीर कारवाई काण्यात येईल असे गोवा पोलीस सुपरिंटेंडेंट शोभित सक्सेना यांनी सांगितले .

त्याशिवाय पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांची पथके प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालत आहेत असेही ते म्हणले. गोवा राज्यातील परदेशी पर्यटकांनी केलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण जवळजवळ ८ टक्क्यांनी वाढले आहे असेही ते म्हणले .आधी परदेशी पर्यटकांच्या गुन्हेगारीचे हे प्रमाण १७४ होते ते आता वाढत जाऊन एकूण १२७४ गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले आहेत.तसेच कोरोनाकाळात हे गुन्हेगारीचे प्रमाण अत्यंत कमी होते कारण गोव्यामध्ये त्यावेळी परदेशी पर्यटक खूपच कमी आले होते.मुख्यतः रशियन,नायजेरियन पर्यटक अमली पदार्थांच्या गुन्ह्याखाली अटक केले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here