कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंन्तर गोव्यामध्ये अचानक डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट मध्ये वास्को आणि पणजी भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत.२०२० मध्ये अवघ्या ३७ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली होती तर यावर्षी जवजवळ ११७ रुग्णांची नोंद झाली आहे.जानेवारी २०२१ पासून ३८३ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे तर हेच प्रमाण २०२० मध्ये २४८ एवढे होते
आजही वास्को मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही.जुलै मध्ये ४१ रुग्ण सापडले होते तर ऑगस्ट मध्ये इथे ४६ रुग्ण सापडले आहेत. नगरपरिषदेकडून फवारणी आणि साठलेले पाणी यांच्यासंबंधी दक्षता घेतली जात आहे असेही सांगितले आहे.


