गेल्या २४ तासात गोव्यामध्ये कोरोनाचे फक्त ३०२ नवीन रुग्ण आढळले असून ९ मृत्यू झाले आहेत.तसेच ४१९ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.त्यामुळे कोविड १९ चा रिकव्हरी रेट ९६% वर पोहोचला आहे.
सध्या ऍक्टिव्ह एकूण केसेस ३४७२ एवढ्या आहेत.गोव्यातील मोठ्या रुग्णालयातही कोविड १९ चे रुग्ण कमी भरती होताना दिसत आहेत. दिवसातून कोविड १९ चे १० रुग्णही भरती होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.पर्वरीमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिन्यापासून रोज ८०ते ९० रुग्ण येत होते ते आता कमी झाले असून दिवसातून पाचपेक्षाही कमी रुग्ण दिसून येत असून ५० व्यक्तीची जर कोरोना चाचणी केली तर त्यात पाचपेक्षाही कमी लोक पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे सांगण्यात आले.शनिवारी १०० पेक्षाही कमी रुग्ण
कोविड १९ पॉझिटिव्ह आले आहेत.४७ कोविड १९ रुग्ण भरती झाले असून ३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोविड १९ च्या नऊ मृत्यूमुळे एकूण मृत्यूची नोंद २९८५ झाली आहे.