पर्यावरणाला मानवाकडून होणारी क्षती अकल्पनीय आहे. पण या सर्वावर मात करत गोव्यातील वालशीम येथील सुजाण नागरिकांनी यावर एक अभूतपूर्व शक्कल लढविली आहे.कोकणात घरोघरी शाडूच्या मातीच्या गणपतीचे आगमन होते. १० दिवसाच्या धामधुमीनंतर गणेशाचे पारंपरिक पद्धतीने समुद्रात अथवा नदीत विसर्जन केले जाते.
पण याच विसर्जनाची पद्धत बांबोलिम येथील वसोलीमच्या नागरिकांनी बदल करत पर्यावरणाला वाचविण्यास सुरुवात केली आहे.मूर्तीचे विसर्जन नदीत केल्यावर त्यात चिकणमातीच्या थर साचला जातो आणि गाळ वाढत जातो.नदीपात्राची खोली कमी होते. याच सगळ्याचा आढावा घेत या नागरिक मूर्तींचे विसर्जन एका मोठ्या हौदात करतात. येतील नगरसेवकांनी सांगितले कि,मूर्ती विरघळल्यानंतर हीच माती पुन्हा कारागिरांना कोणतेही मूल्य न घेता दिली जाते.