युवराज सिंगने YouWeCan नावाची एक संस्था ( फाउंडेशन )सुरू केली आहे.गोवा सरकार ,भारतीय स्टेट बँक आणि युवराज सिंगची हि संस्था यांनी मिळून ‘स्वस्थ महिला,स्वस्थ गोवा ‘ नावाचे एक अभियान सुरु केले आहे. यामध्ये ४० वर्षांपुढील 1 लाख स्त्रियांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये ४० वर्षांपुढील होणाऱ्या स्तनकर्करोगाचे प्राथमिक तपासणी,निदान करण्यात येणार आहे.
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा मेडीकल कॉलेजमधून मंगळवारी या उपक्रमाला सुरुवात केली.या प्राथमिक तपासनीस गोव्यातील ३५ प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुरुवात होणार असून काही ठिकाणी कॅम्पचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
या तपासणीमध्ये प्राथमिक अवस्थेतील स्तनाचा कर्करोग शोधून योग्य उपचार ,योग्य वेळेत करून प्राण वाचावेत असे या संस्थेचा उद्देश आहे.या तपासणीत दोष आढळलेल्या महिलेला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पुढील औषोधोपचारासाठी पाठविण्यात येईल.
युवराज सिंगने आपल्या संदेशात,’ मी स्वतः कॅन्सरचा पीडित होतो आणि मी त्याच्याशी लढून बाहेर पडलो आहे.त्यामुळे जर वेळेत या रोगाचे निदान झाले तर त्यातून आपण बाहेर पडू शकतो हेच मला सांगायचे आहे. महिला या समाजाचा कणा आहेत आणि त्यांचे आरोग्य जपणे हि आपली जबाबदारी आहे असेही त्याने म्हंटले आहे.