गोवा समुद्रकिनाऱ्यावर आता रोज पोलिसांचे पथक फिरणार आहेत. या पोलिसांच्या पथकाला फक्त समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालण्याचे काम दिले आहे. “जागतिक पर्यटन” दिवसाचे औचित्य साधत गोव्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी एका स्वतंत्र पोलिसांच्या पथकाची सोय करण्यात आली आहे. या पोलिसांच्या पथकामध्ये एकूण १०० पोलीस ठेवण्यात आले आहे.
परंतु येणाऱ्या सणांच्या दिवसात पोलिसांच्या संख्येची वाढ करावी असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.वर्षांच्या शेवटी मानविण्यात येणाऱ्या दिवशी कलंगुट आणि बाग समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची खूप गर्दी होते.अशावेळी १०० पोलीस कमी पडणार आहेत.त्या दृष्टीने आतापासुनच सुरुवात करणे आणि विचार करणे आवश्यक आहे असेही पोलिसांनी सांगितले. त्याशिवाय या दिवसांमध्ये २४ तास ७ ही दिवस पोलिसांची गस्तही वाढवायला हवी.
पोलिसांच्या पथकामुळे समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करणाऱ्यांनाही आला बसणार आहे.तसेच फिरत्या विक्रेत्यांनाही थोडा आळा बसणार आहे.हॉटेलांनी शाकारलेल्या शाकच्याही अतिक्रमणावर आळा बसणार आहे.