उत्तर भारतातील पाच पर्यटकांना ‘दृष्टी’ या लाइफगार्डच्या पथकाने दूधसागर नदीच्या पात्रात बुडताना वाचविले. हे सर्व तरुण – तरुणी २० वर्षांच्या वयोगटातील आहेत.
नदीपात्राच्या आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने या तरुणांची गाडी नदीपात्राच्या मध्यात आल्यावर बुडू लागली.गाडीच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने गाडीही बंद पडली.या पर्यटकांना पाण्यात न जाण्याची आणि नदीच्या प्रवाहाला जोर असल्याची स्थानिक ग्रामस्थांनी कल्पना दिली होती. पण या पर्यटकांनी नागरिकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि गाडी प्रवाहात घातली.
दूधसागर वनविभागाचे लोकही पावसाळ्यात नदीला पाणी भरपूर असल्याने स्थानिकांनाही नदीपात्रात जाण्यास मज्जाव आहे .या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही आहे.