गोवा: नववर्षाचे स्वागत करण्यास अनेक जण गोव्यामध्ये येत असतात.पण नेहमीच हा उत्सव संपल्यावर गोव्याचे समुद्रकिनारे लोकांनी बेशिस्तपणे टाकलेल्या दारूच्या बाटल्या,प्लास्टिक यांनी भरून जातात. गोव्याचे स्वच्छ समुद्रकिनारे बघण्यास येणारे हे पर्यटक जाताना मात्र आमचा भाग घाण करून जातात असे उदगार नागरिकांनी काढले आहेत.आम्ही समुद्रकिनारे स्वच्छ ठेवतो म्हणून तुम्ही इथे विरंगुळ्यासाठी येता मग ती स्वच्छता तशीच का ठेऊ शकत नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे
गोव्याचे बागा,कलगुट बीच सगळ्यात जास्त पर्यटकांनी घाण केले आहेत. या दोन्ही समुद्रकिनाऱ्यावर बाटल्यांचा खच पडला आह .त्याखालोखाल प्लास्टीकचा खच पडला आहे.त्यामुळे समुद्र खराब होत आहेच शिवाय नद्याही प्रदूषित होत आहेत.स्वच्छ समुद्रकिनारे प्रचंड घाणीने बजबजुन गेले आहेत.