पणजी: निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे.येत्या काळातील ५ विधानसभा निवडणूक लक्षात घेता गोव्यामध्ये भाजपाला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकेल लोबो यांच्या निर्णयाने जबरदस्त धक्का बसला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो यांनी सोमवारी राजीनामा दिला आणि भाजप हा पक्ष सोडत असल्याचेही जाहीर केले.
भाजपचे गोवा निवडणुकीचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी लोबो यांना रविवारी रात्री फोन केला होता.त्यावेळी अंतर्गत समस्या सोडविण्याचे प्रयत्न करू असेही सांगितले होते. त्याशिवाय गोव्याला लगेचच येऊन समस्या सोडवतो असेही सांगितले होते. परंतु लोबोनी राजीनामा देत पक्षही सोडत असल्याचे सांगत ,’आता या सर्वच काही उपयोग नाही खूप वेळ झाला आहे’ असे सांगितले. त्याशिवाय भाजपाला माझ्यासारखे कार्यकर्ते नको आहेत जेव्हा त्यांना आम्ही नको असतो तेव्हा ते तुम्हाला पक्षातून काढून टाकण्यापेक्षा स्वतःहून पक्ष सोडा असे सांगतात असेही म्हणाले.तसेच दिवंगत मुख्यमंत्री पर्रीकर यांची आठवण काढत ते असते तर मी पक्ष सोडला नसता असेही म्हणाले.अंदाजाप्रमाणे लोबो काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.