गोवा,मुंबई उच्च न्यायालयाने गोव्यातील खाणीतून ,नदीतून बेकायदा प्रचंड वाळू उपसा सुरु आहे. त्यामुळे पोलिसांनी चोवीस तास यावर लक्ष ठेऊन प्रत्येक ट्रकची तपासणी करावी असा आदेश काढला आहे. वाळूच्या प्रचंड बेकायदा उपस्याच्या दोन जागा कोर्टाने दाखून दिल्या आहेत. त्यातील एक जागा आमोणा ब्रिज आणि कन्डोला येथे असून दुसरी जागा सीओलिम येथील माश्यांचे पालन केंद्र आहे तेथून होत आहे.
सर्वात जास्त वाळू उपसा आमोणा पुलाजवळ होत असून भीतीदायक आणि काळजीयुक्त म्हणजे या उपशामुळे पुलालाही धोका निर्माण झाला आहे त्याशिवाय पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे. विभागीय खंडपीठाने सांगितले की,या १५ दिवसात या सर्व ठिकाणी कॅमेरे बसवावेत आणि या बेकायदा पद्धतीला आळा बसावा असा आदेश दिला आहे. वाळू उपस्याचे कंटेनर सरकारी जागेत उभे असलेले कोर्टाने बघितले आहेत.त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी. हे सर्व ट्रक जप्त अशा करावेत आणि त्यांना या जागेपासून दूर सुरक्षित ठिकाणी नजरबंदी ठेवावे. त्याशिवाय हा बेकायदा वाळू उपसा बंद करणे आणि प्रत्येक ट्रकला RTO ने अडवले पाहिजे.
न्यायमूर्ती महेश सोनक आणि एस.एम.जवळकर यांनी आपल्या आदेशात असे म्हंटले आहे कि ‘बेकायदा ट्रक सरकारी जमिनीवर उभे करण्यास का दिले गेले आणि जेव्हा हे ट्रक बेकायदा पद्धतीचे काम करत आहेत हे माहित असुंनही अधिकाऱ्यांनी या ट्रकना कोणत्या आधाराखाली सरकारी जमिनीचे पार्किंग दिले आहे. या सर्वांची चौकशी व्हावी. उच्च न्यायालयाने पांगम यांच्या विधानाप्रमाणे जप्त केलेले सक्शन पंपांचे लिलाव होणार नाहीत आणि त्यांना सरकारच्या कामामध्ये म्हणजेच जसे स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया इ.विभागात वापर करावा.