गोवा: 70% राज्यात वीजपुरवठा बंद आणखी दोन दिवस लागणार

0
117

तौकते चक्रीवादळाचा फटका गोवा राज्याला बसला आहे. वादळाने गोव्यातील ७० % वीजपुरवठा बंद झाला आहे. आज जवळ-जवळ ४८ तास बंद आहे. वादळाने संपूर्ण किनारपट्टीवर आपल्या विक्राळ रूपाची मोहोर उमटविली आहे.विद्युत कर्मचारी या चक्रवातात सर्व विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवसरात्र जातात आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, संपूर्ण राज्यात विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी कमीतकमी अजून दोन दिवस लागणार आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वात जास्त अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि त्यामध्ये जास्त फटका गावांना झाला आहे. महत्वाचे म्हणजे 200 ठिकाणी ट्रान्सफॉर्मेरमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.कमी दाबाचा विद्युत पुरवठा करणाऱ्या ५५ किमी ,उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करणाऱ्या ४५ किमी आणि ५८ किमी एकत्रित विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनी तुटल्यामुळे ७०% विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच १५०० विजेचे खांब वाकले आणि १००० विजेचे खांब तुटले आहेत.

गोव्यातील खेडेगावात वीजपुरवठा बंदच आहे पण पर्वोरीम आणि म्हापसा सारख्या शहरातही गेले ४८ तास वीजपुरवठा बंद आहे. तौकते चक्रीवादळामुळे २२ करोड रुपयांचे नुकसान झाले आहे अशी माहितीही त्यांनी दिली.आमचे लक्ष ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विद्युत पुरवठा सुरळीत करणे हे आहे आणि त्यासाठी विभागाची सर्व माणसे रात्रंदिवस काम करत आहेत असेही ते म्हणाले

कानाकोणम ते बेतावलीम भागात २०० विजेचे खांब तुटून गेले आहेत.तेथील वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान १५-२० दिवसांचा कालावधी लागणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांच्याशी इथल्या परिस्थितीसंबंधी चर्चा केली आहे आणि त्यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.तसेच त्यांनी गोवा राज्याचे तौकते चक्रीवादळाने झालेलया नुकसानीचा रिपोर्ट सविस्तरपणे एका आठवड्याच्या आत केंद्राकडे पाठविण्यास सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here