गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच गोव्यामध्ये १००% लसीकरण झाल्याची माहिती दिली होती. पण काल रविवारी ११५२ लोकांनी पहिला डोस घेतला आहे असे दिसून आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००% लसीकरण झाले म्हणून गोव्याचे ,तेथील नागरिकांचे आणि प्रशासनाचे कौतुकही केले होते.एकत्र येऊन काम करण्याची ताकद काय असते हे गोव्यातील जनतेने आणि प्रशासनाने दाखून दिले अशा शब्दात त्यांनी सगळ्यांचे कौतुक केले होते.
गोव्याच्या आरोग्य व्यवस्थापनेने रविवारी एकूण ६४६८ लोकांचे लसीकरण झाले असून त्यातील ११५२ नागरिकांनी कोरोनाच्या लसीकरणाचा पहिला डोस घेतला आणि ५३१६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असे जाहीर केले.
आज आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील १८ वर्षांवरील ४०.३% नागरिकांचे कोरोनाचे दोनही डोसचे लसीकरण झाले आहे.तर ५७.१२% नागरिकांचे एका डोसचे लसीकरण झाले आहे.आजपर्यंत ९७.% नागरिकांचे कमीतकमी एक डोसचे लसीकरण झाले असून ३०,८५१ नागरिकानीं अजून पहिला डोस घेतलेला नाही.


