प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ -निवजे कुडाळ एस टी बस मध्ये ज्यूनिअर काॅलेज च्या एका विद्यार्थीनीने छत्री विसरली होती. या संदर्भात एस टी डेपो कुडाळ यांचेशी संपर्क साधला असता डेपोचे प्रामाणिक सेवक डायव्हर श्री मुश्ताक खुल्ूली यांच्याशी संपर्क साधला.त्यांनी ताबडतोब फोनवरून संपर्क साधून ती छत्री ताब्यात घेतलीच शिवाय त्यांनी ती काॅलेज मध्ये स्वतः आणून दिली.
गोष्ट साध्या छत्रीची आहे पण या निमित्ताने मुश्ताक खुल्ली यांनी जी तत्परता दाखवली आणि एक सामाजिक भान जपले की ज्यातून इतरांनीही काहीतरी शिकण्यासारखे आहे आणि म्हणूनच त्याच वर्गात त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.कारण गोष्ट साध्या छत्रीची नव्हती तर सामाजिक बांधिलकीची होती त्यावेळी खुल्ली म्हणाले की मी कुडाळ हायस्कूल ज्युनिअर काॕलेजचाच विद्यार्थी आणि याच शाळेने मला हे संस्कार दिले आहेत.