जागतिक पातळीवरील वर्ष 2020चा ‘ग्लोबल टिचर अवॉर्ड’ पटकावल्यानंतर, सोलापूरच्या रणजित सिंह डिसले गुरुजींवर देशभरातून आणि परदेशातूनही कौतुकाचा वर्षाव झाला. तप्रधान कार्यालयानेही डिसले गुरुजींचं अभिनंदन केलं
कोव्हिडच्या महामारीमुळे डिसले गुरुजींना ग्लोबल टिचर्स अवॉर्ड सोहळ्यालाही हजेरी लावता आली नाही. कोरोनामुळे त्यांना हा पुरस्कार सोहळा ऑनलाईनच पाहावा लागला. आता डिसले गुरुजींनी मिळवलेली ट्रॉफी त्यांना घरपोच आली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत.आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची प्रयोगशाळा उभारली आहे. आपल्या याच कल्पकता आणि संशोधनात्मक वृत्तीच्या जोरावर त्यांनी ग्लोबल टिचर अवॉर्ड मिळवला आहे.
डिसले गुरुंजींना आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्रॉफीसोबतच फोटो शेअर करत “हीच ती जीची मी वाट पाहत होतो,” असे लिहीत आनंद व्यक्त केलाआहे. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केलं आहे.