सन 2021 च्या जानेवारीपासून LPG गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या अनुदानीत LPG सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, तर 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडर 75 रुपयांनी महागला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 17 ऑगस्ट रोजी LPG सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केली होती. तर 1 जुलैला LPG सिलिंडरच्या दरात 25.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
मुंबईत घरगुती वापराच्या 14.2 किलोग्रॅमच्या LPG सिलिंडरसाठी आधी 859.50 रुपये लागत होते ते आता 884.50 रुपये द्यावे लागणार आहेत. दिल्लीत घरगुती वापराच्या 14.2 किलोग्रॅमच्या LPG सिलिंडरची किंमत 859.50 होती, ती आता 884.50 रुपये झाली आहे.