घरबसल्या मोबाईल क्रमांक लिंक करा आधार कार्डला

0
65
मोबाईल क्रमांक,आधार कार्ड लिंक

भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधारमधील काही माहिती चुकीची असेल तर आपल्याला अनेक अडचणी येतात. याशिवाय आधारशी मोबाइल नंबर जोडलेला असणे गरजेचे आहे. तुम्ही घरबसल्या देखील आधार आणि मोबाइल नंबर अपडेट करू शकता.

UIDAI ने आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. याद्वारे तुम्हाला घरूनच मोबाइल नंबर अपडेट करण्याची सुविधा मिळेल. ही सुविधा काय आहे ते जाणून घेऊया. याबद्दलची माहिती रविवार पुरवणीमध्ये दिली होती. या योजनेचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी तीच माहिती पुन्हा एकदा देत आहोत.

UIDAI ने इंडिया पोस्‍ट पेमेंट्स बँकेसोबत एक करार केला आहे. या अंतर्गत तुम्ही तुमच्या घरी पोस्टमनला बोलवून आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर बदलू शकता. आयपीपीबीची ही सुविधा त्यांच्या ६५० ब्रँचमध्ये उपलब्ध असेल. या सर्व्हिससाठी १,४६,००० पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक उपलब्ध असतील. लवकरच या सेवेद्वारे लहान मुलांचे आधार देखील बनवले जाईल. आधार आणि पोस्ट ऑफिसच्या या नवीन सुविधेद्वारे मोबाइल नंबर अपडेट करणाऱ्या कोट्यावधी लोकांना फायदा होईल.

ज्या लोकांचा मोबाइल नंबर बंद झाला आहे अथवा रजिस्टर्ड नाही, ते सहज नंबर अपडेट करू शकतील. यासाठी तुम्हाला आधार एनरोलमेंट/अपडेट सेंटरवर जावे लागेल.

  • यानंतर आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी फॉर्म भरून द्यावा लागेल
  • जो मोबाइल नंबर अपडेट करायचा आहे तो फॉर्ममध्ये भरा व त्यानंतर फॉर्म जमा करा.
  • यानंतर व्हेरिफिकेशनसाठी बायोमॅट्रिक्स द्यावे लागेल.
  • आता एक्झिक्यूटिव्हद्वारे तुम्हाला एक पावती दिली जाईल.
  • या पावतीवर एक रिक्वेस्ट नंबर (URN) असेल.
  • या नंबरचा उपयोग तुम्ही अपडेशन स्टेट्स तपासण्यासाठी करू शकता.
  • आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन आधार कार्ड घेण्याची गरज नाही.
  • नवीन मोबाइल नंबर अपडेट झाल्यानंतर त्याच नंबरवर आधार संबंधित ओटीपी येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here