अरबी समुद्रात निर्माण झालेले तौकते चक्रीवादळ जिल्ह्याच्या समुद्रात १६ मी रोजी दाखल होत आहे .रविवारी पहाटे ४ वाजता हे वादळ जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होत असून दु.२ वाजता जिल्ह्याची सीमा ओलांडून पुढे जाणार आहे.त्यामुलेपाहते ४ वाजता ते दुपारी २ या कालावधीत नागरिकांनी अधिक दक्ष राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या तौकते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात १५ ते १६ मी २०२१ या दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र,गोवा किनारपट्टीवर तशी ५० ते ७० कि.मी वेगाने दि.१६ मी २०२१ रोजी तशी ६० ते ८० कि.मी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच समुद्र खवळलेला राहणार आहे.
या कालावधीतसमुद्र खवळलेला राहणार आहे.त्यामुळे मच्छिमारांनी आणि नागरिकांनी समुद्राजवळ जाऊ नये.यावेळी वीजही चाकणार असल्याने वीज चमकत असताना संगणक,टीव्ही,इ.विद्यत उपकरणे बंद ठेवावीत व स्तोत्रांपासून वेगळी करावीत .दूरध्वनी,भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये..घराबाहेर असल्यास विजेच्या खांबापासून लांब राहावे.वीज चमकत असताना झाडाखाली थांबू नये.मोकळ्या मैदानावर असल्यास गुडघ्यात डोके घालून बसावे.