चीनच्या एका इशाऱ्यानंतर गडगडला क्रिप्टोकरन्सीचा बाजार!

0
124

चीनच्या केंद्रीय बँकेने दिलेल्या इशाऱ्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आल्याचे मीडिया रिपोर्टने म्हटले आहे.चीनची केंद्रीय बँक ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ने सर्व डिजिटल चलन क्रिया बेकायदेशीर आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिली होता.

चीनमध्ये व्हर्चुअल करन्सीच्या ट्रेडिंग, ऑर्डर मॅचिंग, टोकन जारी करणे आणि डेरिव्हेटिव्ह्ज यासारख्या सेवांवर पूर्णपणे बंदी आहे. बँकेने म्हटले की, “चीनमध्ये अशा सेवा पुरवणाऱ्या विदेशी क्रिप्टोकरन्सीलाही कायदेशीर मानले जाणार नाही. उल्लेखनीय बाबा म्हणजे क्रिप्टोकरन्सीची मायनिंग करणारा चीन हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे.

चिनी बँकेच्या या इशाऱ्यानंतर आतापर्यंत बिटकॉइनची किंमत 4 टक्क्यांहून अधिक घसरली आणि USD 41,161.00 म्हणजे सुमारे 30,40,254.36 रुपयांवर पोहोचली. त्याचप्रमाणे जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी इथरची (Ether) किंमत 8 टक्क्यांनी घसरली आहे. इथरची संध्याची किंमत USD 2805.81 2,07,221.41 एवढी म्हणजे 2,07,221.41 रुपये एवढी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here