चीनमध्ये 9 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुन शहरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. चांगचुन शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रसार पाहता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला गेला आहे.संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचे एकूण 397 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 98 चांगचुनच्या आसपास असलेल्या जिलिन प्रांतात सापडली आहेत. चांगचुंग शहरात फक्त दोन प्रकरणे आढळून आल्याचे वृत्त समोर येत आहे.
अनेक युरोपीय देश आणि अमेरिकेत अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. भारतातदेखील कोरोना परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. मात्र, मागील काही महिन्यांपासून देशातील रुग्णसंख्या कमी झाली असून, दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे.कोरोना प्रतिबंधक लसीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.या भयंकर विषाणूमुळे अनेकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. यातच नव्या विषाणूमुळे डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे.