रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला आहे आणि विध्वंस घडवून आणला आहे.युक्रेन नाटोमध्ये समाविष्ट होऊ नये यासाठी रशियाने हा हल्ला केला आहे. तर युक्रेनला या परिस्थितीत अमेरिका आणि नाटो देशांकडून युद्धात मदतीची आशा होती. परंतु अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास नकार दिला आहे.त्यामुळे संपूर्ण जग युक्रेनमधील परिस्थितीबद्दल चिंतेत आहे. युक्रेन राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की जगाने आम्हाला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले आहे अशा शब्दात दुःख,वेदना व्यक्त केली आहे.
युक्रेन राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी राष्ट्राच्या नावावर एका व्हिडिओ संबोधनात घोषणा केली की, ‘आपल्याला आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी एकटे सोडण्यात आले आहे.’ युक्रेन आता रशियाशी स्वबळावर युद्ध लढणार आहे. आपल्यासोबत लढायला कोण तयार आहे? मला कोणी दिसत नाही. युक्रेनला नाटो सदस्यत्वाची हमी देण्यास कोण तयार आहे? सगळे घाबरले आहेत. रशियनांचे पहिले टार्गेट तेच स्वतः असून दुसरे टार्गेट त्यांचे कुटुंब असल्याचेही त्यांनी सांगितले. रशियन सैन्य आता कीवमध्ये दाखल झाले आहे.युक्रेन राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की आणि त्यांचे कुटुंबीय कीवमध्ये आहेत. युक्रेनने आपल्या 10,000 नागरिकांना लढाईसाठी रायफल दिल्या आहेत.देशासाठी लढण्याची काहींनी तयारी देर्शविली आहे. तर काही लोक दुसऱ्या देशां जाण्यास निघाले असून सुरक्षेच्या दृष्टीने काहींनी भुयारी मार्गाचा आधार घेतला आहे.

