तस पहिल तर उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच चर्चेत राहिले आहेत.अलीकडेच त्यांच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. अजित पवारांच्या संबंधित व्यक्तींच्या साखर कारखान्यावर आणि त्यांच्या बहिणींच्या घरी देखील आयकर विभागाने छापेमारी केली होती. आता पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले आहेत.त्याचे कारण म्हणजे पुण्यात लावण्यात आलेल्या त्यांचे बॅनर.
पवार समर्थकांकडून पुण्यात “जत्रेत खेळणाऱ्यांनी तालमीतल्या पैलवानांचा नाद करू नये ” असे लिहिलेले बॅनर लावण्यात आले आहे. तसेच ‘समझने वालों को इशारा काफी है’ असेही यात म्हटले आहे. यासोबत अजित पवार यांचा हातात तलवार घेतलेला फोटोही यामध्ये आहे. भारती विद्यापीठ परिसरात नगरसेवक युवराज बेलदरे यांनी अजित पवारांच्या समर्थनार्थ हा बॅनर लावलेला आहे


