श्रीनगरच्या जे-वन खोनमोह रोडहून भारतीयबसदेखील बुलेटप्रूफ नसल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडे शील्ड आणि लाकडी दांडे होते. अतिरेक्यांनी बसला थांबवण्यासाठी बसच्या टायरावर गोळीबार केला, त्यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला. रिझर्व पोलिसांची (IRP)9वी बटालियन गाडी जात असताना, अतिरेक्यांनी त्या बसवर गोळीबार करत हल्ला केला. त्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, 12 पोलिस कर्मचारी जखमी आहेत. या सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.


