जम्मू विमानतळाच्या तांत्रिक क्षेत्राजवळ दोन स्फोट;2 जवान जखमी

0
111

ड्रोनच्या सहाय्याने घडवण्यात आले स्फोट

एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या तांत्रिक विभागात रविवारी पाच मिनिटांच्या अंतरावर हे दोन स्फोट झाले आहेत. रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी पहिला तर १ वाजून ४२ मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. स्फोटामध्ये इमारतीचं छपराचा भाग कोसळला आहे. ड्रोनच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला असून यासाठी स्फोटक उपकरणाची मदत घेण्यात आली.

जम्मू विमानतळ या दोन स्फोटांनी हादरलं आहे. हे दोन स्फोट झाले आहेत. कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही झालेल्या या स्फोटांमुळे चिंता व्यक्त होत आहे. ड्रोनच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला असून दहशतवादी हल्ला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेला नाही.या भागात जम्मूतील महत्वाचे विमानतळही येत असल्याने हा भाग पूर्णपणे सीलबंद करण्यात आला आहे.  या स्फोटांमुळे एका इमारतीच्या छताचं नुकसान झालं असून दुसरा मोकळ्या परिसरात पडला. स्फोटात कोणतंही नुकसान झालेलं नाही. याप्रकरणी स्थानिक यंत्रणांसोबत तपास सुरु आहे”.

दरम्यान स्फोटांची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here