कोल्हापूर – जागतिक कबड्डीत भारताचे उच्चस्थान राहण्यासाठी प्रशिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रशिक्षक व माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी ते अंगीकारावे असे आव्हान शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी केले. कोल्हापूर येथील कबड्डी राव’ज अकॅडमी मध्ये भारतातील नामांकित खेळाडू व प्रशिक्षक यांचे शिबिराचे उद्घाटन डॉ शिर्के यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अँड आस्वाद पाटील होते.कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन,कबड्डी राव’ज अकॅडमी व न्यू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात प्रथमच आयोजित कबड्डी प्रशिक्षकासाठी उच्च गुणवत्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून यामध्ये भारतातील नामवंत खेळाडू व प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. चार दिवस चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन कबड्डी राव’ज अकॅडमीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात झाले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांना बोलावून आंतर राष्ट्रीय स्तरावरही प्रशिक्षकांचे असे अनोखे शिबिर राज्य संघटनेच्यावतीन घेण्यात येणार असून या माध्यमातून महाराष्ट्राचे कबड्डीतील अव्वल स्थान कायम राहील. असे राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह अँड आस्वाद पाटील यांनी केले खेळाडूं मधील त्रुटी व शेवटच्या काही मिनिटातील तणाव हा मुख्य विषय घेऊन आयोजित या उपक्रमाचे आणि राव’ज अकॅडमी मधील विविध उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. क्रीडांगणावर दोन्ही संघातील खेळाडूंनी गडी बाद केल्याबाबत शपथेवर पंचाकडे दाद मागतात. ही प्रथा बंद करावी असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ शिर्के यांनी सांगून लवकरच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व क्रीडाशिक्षकांचे नियोजनासाठी सभा घेन्यात येईल. प्रारंभी वृक्ष रोपास मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ रमेश भेंडीगिरी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर प्रास्ताविक प्रमुख मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटनेचे तांत्रिक समिती प्रमुख ई प्रसदराव यांनी करताना शिबिराचा हेतू विधित केला. या मध्ये प्रामुख्याने वैचारिक मंथन होणार आहे.
न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही एम पाटील यांनी व कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्रा संभाजी पाटील यांनी शिबिरार्थी ना शुभेच्छा दिल्या. या वेळी सहभागी प्रशिक्षकांचा मान्यवरच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार चंद्रशेखर शहा यांनी मांडले. या कार्यक्रमास शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिह पाटील आंतरराष्ट्रीय खेळाडू उमा भेंडीगिरी राज्य संघटनेच्या तांत्रिक समितीचे प्रमुख जे जे पाटील , विद्यापीठाचे क्रीडा विभाग प्रमुख पि टी गायकवाड यांच्या सह कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.


