जीनोम सिक्वेसिंग मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांबाबत अधिकृत माहिती.

0
131

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण १५ कोविद रुग्ण हे जीनोम सिक्वेसिंगमध्ये डेल्टाप्लस व्हेरिएंटचे आढळले असल्याचे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.हे सर्व रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील आहेत. यापैकी तीन रुग्णांची माहिती कालच राज्य स्तरावरून कळविण्यात आली आहे.हे तीन रुग्ण जुलै महिन्यात कोविड बाधित म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात उपचार घेत होते.


यातील दोन रुग्ण मौजे अंगवली व एक रुग्ण मौजे धामणी तालुका संकेश्वर मधील असून हे तिन्ही रुग्ण उपचार नंतर पूर्णपणे बरे झालेले आहेत.एकूण १५ रुग्णांपैकी एका रुग्णाचा उपचारा दरम्यान वुमन्स हॉस्पिटल रत्नागिरी येथे मृत्यू झालेला आहे व एका रुग्णाचा मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे.परंतु सदर रुग्णाच्या आधार कार्ड वरचा पत्ता हा रत्नागिरीचा असल्याने त्याची नोंद या जिल्ह्यात घेण्यात आलेली आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here