मुंबई: भारतीय टायर क्षेत्रातील प्रमुख जेके टायर अँड इंडस्ट्रीजने ‘लेविटास अल्ट्रा’ श्रेणीचे टायर्स बाजारात आणून अत्यंत वेगाने वाढणाऱ्या लक्झरी कार विभागात प्रवेश केला आहे. प्रिमियम कारसाठी खास डिझाईन केलेल्या ‘लेविटास अल्ट्रा’ या नवीन श्रेणीचे पश्चिमेकडील प्रदेशांसाठी आज मुंबईत जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष (भारत) श्री. अनुज कथुरिया यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/रत्नागिरी-रत्नागिरीतील/
अर्थव्यवस्थेचे चांगले पुनरुज्जीवन होत असताना भारतीय ऑटोमोबाइल उद्योग बाजारपेठेत जवळपास ५०% वाढीसह लक्झरी कारच्या मागणीतही वाढ होत आहे. ‘लेविटास अल्ट्रा’ च्या या प्रवेशासह जेके टायर बाजारपेठेतील वाढत्या गरजा लक्षात घेऊन बाजारातील या वाढीचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहे. यूरोप आणि भारत दोन्हीकडे सखोल चाचणी केलेले हे अल्ट्रा हाय परफॉर्मेंस (UHP) टायर्स उच्च टिकाऊपणा, अत्यंत आरामदायी आणि कमी आवाज अशा सर्व महत्त्वाच्या पैलूंमध्ये सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता देतात.
भारतीय रस्ते आणि येथील हवामान यासाठी सुयोग्य आणि परिपूर्ण अशी ‘लेविटास अल्ट्रा’ श्रेणी प्रिमियम कारसाठी २२५/५५ R१६ पासून ते २४५/४५ R१८ पर्यंत सात आकारांमध्ये उपलब्ध होतील, जे या ब्रॅंडला आणखी जास्त वाढण्यात मदत करेल. याशिवाय, जेके टायर्सने लक्झरी कार्सच्या संपूर्ण कार्यक्षेत्राला समाविष्ट करण्यासाठी १९-२२ इंच टायर रेंज नव्याने बाजारात आणून ‘लेविटास अल्ट्रा’ चा पोर्टफोलिओ वाढवण्याची योजना आखली आहे. शाश्वतता गुणांक वाढवण्याच्या आणि भारतीय ग्राहकांना अत्याधुनिक उत्पादने देण्याच्या निरंतर प्रयत्नात असणाऱ्या ‘लेविटास अल्ट्रा’ला इंधन बचतीसाठी पाच स्टार दिले गेले आहेत.
या लाँचच्यावेळी जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष (भारत) श्री. अनुज कथुरिया म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने देण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहोत. ‘लेविटास अल्ट्रा’च्या अनुषंगाने लक्झरी कार मालकांसाठी प्रिमियम कार टायर क्षेत्रात प्रवेश करताना आम्हाला आनंद होत आहे. हे अल्ट्रा हाय परफॉर्मेंस (UHP) टायर्स आरामदायी प्रवास, हाताळणी, ब्रेक, आणि कमी आवाज अशा सर्व महत्त्वाच्या निकषांवर अतुलनीय कामगिरी प्रदान करण्याच्या आमच्या दृढ वचनबद्धतेचा पुरावा आहेत. ‘लेविटास अल्ट्रा’ श्रेणी खास भारतीय रस्त्यांसाठी डिझाईन केलेली आहेत आणि देशातील प्रिमियम कार वापरकर्त्यांची खास पसंत बनण्याची त्यामध्ये प्रचंड क्षमता आहे.”
संपूर्ण श्रेणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान
केवळ लक्झरी कार विभागासाठी डिझाईन आणि विकसित केलेले ‘लेविटास अल्ट्रा’मध्ये अपवादात्मक तांत्रिक वैशिष्ठ्ये आहेत. नवीन ‘लेविटास अल्ट्रा’मध्ये सर्वोत्कृष्ट दर्जाची राइड व हाताळणी क्षमता असून गाडी चालवण्यासाठी ज्या परिस्थितींची सर्वात जास्त मागणी असते त्यांच्यासाठी उच्च दर्जाची क्षमता यात आहे. ही नवीन श्रेणी कोरड्या आणि ओल्या परिस्थितीत कमीत कमी ब्रेकिंग अंतराचा दावा करते आणि अजून जास्त वाढलेली सुरक्षा प्रदान करते. ‘लेविटास अल्ट्रा’च्या हाताळणी वैशिष्ट्यांमध्ये लॅटरल कंट्रोल आणि इष्टतम रेंज मध्ये ग्रिप ठेवून उत्तम ड्रायव्हिंग प्रतिसादाची खात्री दिली जाते. अनुकूल असा बाह्य आराखडा आणि विशेष अशी आवाज न येऊ देणारी रचना यामुळे कॅबिनमध्ये कमीत कमी आवाज येऊन आरामदायी प्रवास सुनिश्चित होतो. हे यूएचपी टायर्स उच्च दर्जाच्या एमएफएक्स (MFX) पॉलिमरने तयार केलेले आहेत, जे भारतीय रस्त्यांवर अपवादात्मक टिकाऊपणा आणि हार्ड कॉर्निंग दरम्यान स्थिरता सुनिश्चित करतात. अत्यंत सानुकूल ट्रेड पिच क्रम ओल्या परिस्थितीमध्ये वेगांच्या एका श्रेणीत सहज आरामदायी प्रवास प्रदान करतो. ठराविक जास्त प्रमाणात जाडी असलेले मजबूत स्तर टायर्समध्ये छिद्र पडायला उत्तम प्रतिकार करते.
भारतीय आणि यूरोपीय भूभागांमध्ये सर्वसमावेशकपणे चाचणी केलेले:
भारतीय रस्त्यांवर आणि भारतीय हवामानात सुरळीत गाडी चालवायला, आरामदायी प्रवास आणि सुरक्षितता यासाठी, विशेषतः वेग वाढल्यावर, शक्तिशाली टायर्सची आवश्यकता असते. स्थानिक ग्राहकांच्या बदलत जाणाऱ्या गरजा समजून घेण्याच्या जेके टायर्सच्या अनेक दशकांच्या अनुभवाने सखोल आणि व्यापक चाचणी घेण्यात आणि ‘लेविटास अल्ट्रा’ला भारतीय परिस्थितीमध्ये परिपूर्ण करण्यात मदत केली आहे. हे प्रिमियम टायर्स भारत आणि यूरोप दोन्हीकडे सर्वाधिक मागणी असलेल्या परिस्थितीत व भूप्रदेशांमध्ये वापरकर्त्यांनी घेतलेल्या चाचण्या आणि बोर्ड टेस्टिंगद्वारे ‘अल्ट्रा हाय परफॉर्मेंस’च्या मूलभूत डीएनएसह योग्य फेरफार व बदल करून उत्तम वापरासाठी साजेसे व सानुकूल केले आहे; ज्यामुळे गाडी चालवण्यासाठी ज्या परिस्थितींची सर्वात जास्त मागणी असते त्यांच्या अनुषंगाने उच्च दर्जाची क्षमता या टायर्समध्ये आहे.
भारतातील प्रमुख ठिकाणी उपलब्धता:
लेविटास अल्ट्रा रेंज टायर्स १ एप्रिल २०२३ पासून भारतातील प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होतील.


