जेजुरीच्या खंडोबा दर्शनाला आंध्रच्या तिरुपती देवस्थानचे सदस्य यांनी भेट दिली. खंडोबा देवस्थानच्या वतीने त्यांचे गुरव, पुजारी सेवकवर्ग यांनी केले. भारतातील ख्यातिप्राप्त अशा आंध्र प्रदेशच्या तिरूमल तिरुपती बालाजी देवसंस्थान कमिटीचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी संघटक सचिव रिशिआणा पांडे यांनी प्रख्यात महाराष्ट्र कुलस्वामी जेजुरी खंडोबा मल्हारी मार्तंड देवाला महाअभिषेक घातला.
यावेळी खंडोबा देवता गुरव पुजारी घडशी कोळी सेवकवर्गाने ऋषी पांडे यांचा प्रतिमा देऊन सन्मान केला. या प्रसंगी राष्ट्रवादी कार्यकर्ते राहुल घाडगे, तसेच भाजपा सदस्य सचिन पेशवे माजी नगरसेवक शेरे पाटील, सतीशनाना कदम उपस्थित होते. जेजुरी नगरीत पांडे यांचे आगमन होताच माजी नगराध्यक्ष दिलीपदादा बारभाई यांनी त्याचा गौरव केला.” खंडोबा दर्शनाने मी धन्य झालो असून मला बालाजी दर्शन इतकाच आनंद झाला आहे. माझ्या खंडोबा देवता च्या गुरव पुजारी समाजाची उपासना अतिशय सुंदर पद्धतीची असल्याचा मला अभिमान वाटतो असे पांडे यांनी आपले मत व्यक्त करताना संगितले


