जेष्ठ साहित्यिक,सामाजिक कार्यकर्त्ये,लेखक डॉ.अनिल अवचट यांचे निधन

0
66
लेखक डॉ.अनिल अवचट

जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्त्ये सामाजिक कार्यकर्त्ये,लेखक डॉ.अनिल अवचट यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाल्याची बातमी नुकतीच हाती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू होते.डॉक्टर अनिल अवचट यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली.मुक्तांगण या संस्थेने अनेक आयुष्य उध्वस्त होण्यापासून रोखली. त्यांनी समाज परिवर्तनाचाही विडा उचलला होता. समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण करत त्यांनी अनेक कार्य केली.त्यांनी  वैद्यकीय व्यवसाय न करता सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतला.

1959 मध्ये दहावी झाल्यावर फर्ग्युसन कॉलेज (पुणे) मधून ते इंटर आणि पुण्याच्याच बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. झाले. पण त्यांनी वैद्यकीय व्यवसाय न करता सामाजिक चळवळीत भाग घेतला.पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली, त्यांच्या लेखणीतून, पुस्तकाद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here