देशभरात 75 स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अनेक नेत्यांनी विविध ठिकाणी जाऊन ध्वजारोहन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मुंबईमधील आयईएस राजा शिवाजी शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन केले. यावेळी भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल भाष्य केले आहे.
‘आपण इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो ते भारतातून येत नाही. त्यामुळे आपण शेजारी राष्ट्र चीनबाबत कितीही ओरडलो तरी आपल्या फोनमधील ज्या वस्तू आहेत त्या चीनमधून येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबुन राहणे कमी होणार नाही तोपर्यंत चीनसमोर झुकावे लागणार असल्याचं मोहन भागवत म्हणाले.15 ऑगस्टला 1947 रोजी आपल्याला आपला देश मिळाला, आपला देश परकीयांच्या हाती होता तो आपला झाला आणि आपण आपलं जीवन चालवण्यासाठी आपण मुक्त झाल्याचं भागवत यांनी सांगितलं.