कोरोनाना देशात घातलेले थैमान वाढतच चालले आहे. घराघरात कोरोनाचे पेशंट सापडत आहेत.कोरोना रुग्णांनी रुग्णालये खचाखच भरलेली आहेत. औषधे आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर टाटा स्टीलने ट्विट करत देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता २००-३०० टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती दिली आहे.
“कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना २०० ते ३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्हीदेखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू,” असा विश्वास टाटा स्टीलने व्यक्त केला आहे.मागच्या कोरोनाच्या लाटेतही काळात आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकरता ताज हॉटेलसह इतर हॉटेल डॉक्टरांना राहण्यासाठी दिले होते त्याचबरोबर त्यांच्या जेवणाची सोयही केली होती. त्यावेळीही टाटांनी देशवासियांसाठी लाखमोलाची मदत केली होती. आता त्यांनी महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवड्याची समस्या लक्षात घेता २०० ते ३०० टन मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
32People Reached1EngagementBoost Post
11