मुंबई, टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या नेटवर्कचा विस्तार केला असून त्यामुळे टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर्स महाराष्ट्रातील मुंबई, नेरूळ, वसई आणि कल्याण येथे उपलब्ध होणार आहेत. या बाजारपेठांतील ग्राहकांना आता जवळच्या टीव्हीएस मोटर्सच्या वितरकाला भेट देऊन #ExperienceElectric घेता येणार आहे.
टीव्हीएस आयक्यूबद्वारे विविध प्रकारची बुद्धीमान आणि कनेक्टेड वैशिष्ट्ये देण्यात येतात व त्यामध्ये ७” टीएफटी टचस्क्रीन आणि युआय, इन्फिनिटी थीमचे पर्सनलायझेशन, व्हॉइस असिस्ट आणि टीव्हीएस आयक्यूब अलेक्सा स्किलसेट, इंट्युटिव्ह म्युझिक प्लेयर कंट्रोल, ओटीए अपडेट्स, प्लग अँड प्ले चार्जर तसेच कॅरी अलाँग चार्जर, वाहनाची स्थिती आणि सुरक्षेच्या सूचना, विविध ब्लुटुथ आणि क्लाउड कनेक्टिव्हिटी पर्याय, सीटखाली २ हेल्मेटसाठी जागा या व अशा इतर वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
टीव्हीएस मोटर्सच्या विश्वासार्ह इंजिनियरिंग क्षमतांचा पाठिंबा लाभलेले टीव्हीएस आयक्यूब दमदार चाचणीतून तयार झालेले असून त्याला प्रस्थापित नेटवर्क, रिलेशनशीप व्यवस्थापक आणि समग्र डिजिटल यंत्रणेचे पाठबळ लाभलेले आहे.
टीव्हीएस आयक्यूब सीरीजमध्ये ११ रंगांतील ३ प्रकारांचा समावेश असून चार्जिंगचे ३ पर्याय आहेत.
टीव्हीएस आयक्यूब आणि टीव्हीएस आयक्यूब एस अनुक्रमे १,१८,३८३ रूपये आणि १,२६,२८५ रुपयांच्या आकर्षक किंमतीत (ओन रोड महाराष्ट्र, FAME II राज्य अनुदानासह) उपलब्ध आहे.
या स्कूटर्स पुढील वितरकांकडे खरेदी व टेस्ट राइडसाठी उपलब्ध आहेत.


