भारताला थाळीफेकमध्ये पदक मिळेल अशी आशा होती. परंतु, ऑलिम्पिकच्या 11 व्या दिवशी थाळीफेकमध्ये कमलप्रीतला पदक जिंकता आले नाही. कमलप्रीतने अंतिम फेरीत सर्वोत्तम 63.70गुण घेत ती सहाव्या स्थानावर राहिली. कमलप्रीतने 5 पैकी 2 फेऱ्यांमध्ये फाऊल फेकले आहे. तीने पहिल्या फेरीत 61.62 मीटर तर तिसऱ्या फेरीत 63.70 मीटर फेकले.
विशेष म्हणजे कमलप्रीतला क्वालिफाईंग फेरीतील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. यावेळी तीने 64 मीटर अंतरासाठी थाळी फेकली होती. परंतु, ती कामगिरी आता करता न आल्याने तीला पदकापासून वंचित राहावे लागत आहे.