सिंधुदुर्ग- अभिमन्यु वेंगुर्लेकर
काही महिन्यापूर्वी भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या टोमॅटोमुळे आता शहरी भागातील नागरिकांचा खिसा कापला जात आहे.
कारण टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. टोमॅटो स्वयंपाकात नियमित वापरला जाणारा पदार्थ असल्याने महाग असला तरी तो विकत घ्यावाच लागत आहे. आवक घटल्याने टोमॅटोचे दर अचानक वाढले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात किरकोळ बाजार टोमॅटोचे दर 50-60 रुपयांवर पोहोचले आहे. मागील काही दिवसात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
या अवकाळी पावसामुळे आणि बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. यात टोमॅटोच्या पिकावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराक कमी झाली. आवक घटल्याने टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे.