आरुष कोल्हेची नाबाद शतकी खेळी; वेंगसरकर संघ ; गावस्कर संघाने शास्त्री संघाला २०९ धावांवर रोखले
मुंबई, ३० मे : आरुष कोल्हेच्या (खेळत आहे १८३) दमदार नाबाद शतकी खेळीमुळे वेंगसरकर संघाने ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या शेवटच्या साखळी लढतीत आज पहिल्या दिवशी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. पहिल्या दोन्ही लढतीत शतकाने हुलकावणी दिलयानंतर आज मात्र त्याने सारी कसर भरून काढण्याच्या जिद्दीने फलंदाजी केली आणि समोरून अन्य फलंदाजांची पाहिजे तेवढी साथ मिळत नसतानाही आपल्या धावांचा ओघ कायम राखला. त्याच्या नाबाद १८३ धावांमुळे वेंगसरकर संघाने पहिल्या दिवसाखेर ८६ षटकांत ७ बाद ३१९ धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या रोशन फारुकी (२२), अरहाम जैन (१८), लक्ष्मणप्रसाद विश्वकर्मा (२३) आणि दर्शन राठोड (खेळत आहे २२) यांची त्याला सुरेख साथ लाभली. तेंडुलकर संघाच्या अनुज सिंग (३५/२), मोक्ष निकम (५०/२) आणि आर्यन कुमार (४८/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. ttps://sindhudurgsamachar.in/maharashtraक्रीमलाइन-डेअरी-प्रॉडक/
कर्नाटक स्पोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत सुनील गावस्कर संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या रवी शास्त्री संघाला ४६.४ षटकांत २०९ धावांवर रोखले. प्रवीर सिंग याने ६२ धावांत ४ फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखविला तर शौर्य राणे (४४ धावांत ३ बळी) आणि शेन रझा (३४ धावांत २ बळी) यांनी देखील अचूक गोलंदाजी केली. रवी शास्त्री संघासाठी यश सिंग या सलामीवीराने (५३)केवळ ३५ चेंडूत अर्ध शतकी खेळी करताना ११ चौकार ठोकले. शाहिद खान याने ६८ तर कबीर जगताप याने नाबाद ७४ धावांची खेळी करून संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना गावस्कर संघाने ३२ षटकांत २ बाद १०३ धावा केल्या आहेत, त्यात देवाशिष घोडके याचा ४२ धावांचा वाटा होता.
संक्षिप्त धावफलक : कर्नाटक स्पोर्टींग – रवी शास्त्री संघ – ४६.४ षटकांत सर्वबाद २०९ (यश सिंग ५३, शाहिद खान ६८, कबीर जगताप नाबाद ७४; शेन रझा ३४/२, शौर्य राणे ४४ धावांत ३ बळी, प्रवीर सिंग ६२ धावांत ४ बळी) वि. गावस्कर संघ – ३२ षटकांत २ बाद १०३ (वेदांग मिश्रा २४, देवाशिष घोडके ४२, अगस्त्य काशीकर खेळत आहे २५)
ओव्हल मैदान – वेंगसरकर संघ – ८६ षटकांत ७ बाद ३१९ (रोशन फारुकी २२, अरहाम जैन १८, आरुष कोल्हे खेळत आहे १८३ , उज्ज्वल सिंग १५, दर्शन राठोड खेळत आहे 22; अनुज सिंग ३५ धावांत २ बळी , मोक्ष निकम ५० धावांत २ बळी, आर्यन कुमार ४८ धावांत २ बळी)वि. तेंडुलकर संघ.