अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तब्बल 12 दिवसांनंतर तुरुंगातुन सुटका झालीआहे.मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने बुधवारी जामीन मंजूर केला.पण प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भायखळा तुरुंगाबाहेर पडल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यामांना प्रतिक्रिया देणे टाळले. त्यांनी फक्त हात जोडून नमस्कार केला. त्यांच्यावर राजद्रोहाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.विविध अटींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे.रवी राणा हे तळोजा तुरुंगात होते.


