तळाशील गावासाठी मंजूर केलेल्या बंधाऱ्यांच्या कामाला आजपासून सुरुवात

0
187

आ. वैभव नाईक यांनी खा.विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने तळाशील ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

तळाशील गावासाठी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून घेतलेल्या ५४ लाखाच्या दोन धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला आज गुरुवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. तळाशील गावात तातडीने बंधारा बांधण्याचा शब्द आ. वैभव नाईक यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले होते. या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात झाल्याने आ. वैभव नाईक यांनी तळाशील ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला आहे.


तळाशील गावातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी ग्रामस्थांनी उपोषण छेडले होते. आमदार वैभव नाईक यांनी खा.विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून तातडीने धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर करून घेत उपोषण स्थळी भेट देऊन धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याचे काम शुक्रवार पासून सुरु करण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता.त्यांच्यावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले होते.

आ. वैभव नाईक व शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे,तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मच्छीमार नेते बाबी जोगी, सरपंच आबा कांदळकर, विभाग प्रमुख समीर लब्दे यांनी तळाशील ग्रामस्थांना धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा दिलेला शब्द पाळला असून एक दिवस अगोदरच धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला आज गुरुवार पासून सुरुवात करण्यात आली आहे.

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here