तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत टिप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधीच्या वडिलांचे निधन झाले. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर भव्यच्या वडिलांना मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या १० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
काल रात्री त्यांनी विनोद गांधी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. विनोद गांधी यांच्या पश्चात त्यांची पत्नी यशोदा आणि दोन मुले निश्चित आणि भव्य असा परिवार आहे.