तारापूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत मोठा स्फोट, एका कामगाराचा मृत्यू तर 5 जण जखमी

0
188

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या, तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट जे- 1 मधील कापडाचे उत्पादन करणाऱ्या जखारिया लिमिटेड कंपनीमध्ये हा स्फोट झाला त्यानंतर कंपनीला भीषण आग लागली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या स्फोटाचा आवाज तीन ते चार किलोमीटर परिसरापर्यंत ऐकू आला. कंपनीला लागलेली आग खूप भीषण आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here