एलआयसीच्या आयपीओची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होत आहे. हा आयपीओ प्रायमरी मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. भारत सरकारने त्याची किंमत देखील निश्चित केली आहे. BSE वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार LIC IPO सबस्क्रिप्शन 4 मे 2022 रोजी ओपन होईल आणि 9 मे 2022 पर्यंत बोलीसाठी खुले असेल.
भारत सरकारने LIC IPO ची किंमत 902 रुपये ते 949 रुपये निश्चित केली आहे.भारत सरकारने किरकोळ आणि पात्र कर्मचारी श्रेणीसाठी प्रति इक्विटी शेअर 45 रुपये आणि पॉलिसीधारक श्रेणीसाठी 60 रुपये प्रति इक्विटी शेअरची सूट जाहीर केली आहे.भारत सरकारने किरकोळ आणि पात्र कर्मचारी श्रेणीसाठी प्रति इक्विटी शेअर 45 रुपये आणि पॉलिसीधारक श्रेणीसाठी 60 रुपये प्रति इक्विटी शेअरची सूट जाहीर केली आहे.भारत सरकारने एलआयसी पॉलिसी धारक अर्जदारांना प्रति इक्विटी शेअर 60 रुपयांची सूट जाहीर केली आहे. ज्यांनी त्यांची पॉलिसी 13 एप्रिल 2022 रोजी किंवा त्यापूर्वी खरेदी केली होती केवळ तेच LIC पॉलिसीधारक या सवलतीसाठी पात्र असतील.