अफगाणिस्तान भारत देशांमधील व्यापारी संबंध शतकांपासून आहेत.भारताने अफगाणिस्तानातील अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर लाखो लोक अफगाणिस्तानातून पळून जात आहेत.
तालिबानची सत्ता आल्यानंतर आयात-निर्यात आणि मोठ्या प्रकल्पांवर थेट परिणाम होत आहे. गेल्या २० वर्षांमध्ये भारताचा अफगाणिस्तानसोबत द्विपक्षीय व्यापार वेगाने वाढला आहे. २०१९-२०२० मध्ये आयात आणि निर्यातीत वाढ झाल्याने द्विपक्षीय व्यापार १.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला होता.भारत अफगाणिस्तानमधून सुमारे ८५ टक्के सुक्या मेव्यासह बहुतेक तिखट मसाल्यांची आयात करतो. अफगाण निर्यातीमध्ये ताजी फळे, अंजीर, अक्रोड, बदाम, जर्दाळू, हिरवा आणि काळा मनुका, सुगंधी हिंग आणि अंजीर यांचा समावेश आहे. भारतातून निर्यातीत कापड, औषधी, वैद्यकीय उपकरणे, संगणक, हार्डवेअर साहित्य, सिमेंट, साखर आणि कृत्रिम तंतू यांचा समावेश आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापारात पाकिस्तानची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारतातून अफगाणिस्तानला निर्यात होणाऱ्या वस्तू पाकिस्तानातील कराची बंदरातून पाठवल्या जातात, जेथे माल ट्रकमध्ये चढवण्यापूर्वी तोरखाम आणि चमनच्या एएफ-पाक सीमा बिंदूंवर पाठविला जातो.