राज्यात ‘तौकते’ चक्रीवादळाने कोकणासह मुंबई, ठाणे, पालघरसह सात जिह्यांना प्रचंड तडाखा दिला होता. वादळामुळे अनेक लोणच्या फळबागांचे,घरांचे,बोटींचे नुकसान झाले होते. त्यांनतर मुख्यमंत्र्यांनी वादळग्रस्त भागात भेटी दिल्या होत्या.तसेच तेथील झालेल्या नुकसानाचा आढावाही मागितला होता.या चक्रीवादळग्रस्तांना मदतीची घोषणा राज्य सरकारने केली होती.
त्यानुसार राज्याच्या महसूल व वन विभागाने वाढीव दराने मदत देण्याचे आदेश आज जारी केले आहेत. त्यामुळे तौकते चक्रीवादळग्रस्तांना 252 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अतिरिक्त एक लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे..
आज जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत जर नैसर्गिक आपत्तीत घर पूर्णपणे नष्ट झाले असल्यास घरगुती कपडे व वस्तूंसाठी प्रति कुटुंब पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. वादळात घराचे पत्रे, कौले उडून गेले असल्यास कपडे, घरगुती भांडी वस्तूंसाठी प्रति कुटुंब पाच हजार रु.भरपाई दिली जाणार आहे.पूर्णपणे नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी मदत- दीड लाख रु.मदत जाहीर करण्यात आली आहे. अंशतः पडझड झालेल्या (किमान 15 टक्के) पक्क्या/कच्च्या घरांसाठी मदत 15 हजार रु.देण्यात येणार आहे.अंशतः पडझड झालेल्या (किमान 25 टक्के) पक्क्या- कच्च्या घरांसाठी 25 हजार रु.देण्यात येणार आहे. अंशतः पडझड झालेल्या (किमान 50 टक्के) पक्क्या -कच्च्या घरांसाठी 50 हजार रुपयांची मदत.देण्यात येणार आहे. नष्ट झालेल्या पात्र असलेल्या झोपडय़ांना 15 हजार रु. मदत मिळणार आहे. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 50 हजार रु. मदत दिली जाणार आहे. नारळाच्या प्रति झाडासाठी- 250 रु. z सुपारी झाडासाठी- 50 रुपये प्रति झाड (2 हेक्टरच्या मर्यादेत) दिली जाणार आहे. दुकानदार व टपरीधारकयांच्या प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या बोटीसाठी 25 हजार रु. तर बोटीच्या अंशतः दुरुस्तीसाठी 10 हजार रु. दिले जाणार आहेत. नष्ट झालेल्या मासेमारी जाळीसाठी व अंशतः खराब झालेल्या जाळीसाठी 5 हजार रु.ष्ट झालेल्या मासेमारी जाळीसाठी व अंशतः खराब झालेल्या जाळीसाठी 5 हजार रु.दिले जाणार आहेत.

