भारतीय हवामान विभागाने तौक्ते चक्रीवादळ सध्या लक्षद्वीपमध्ये सक्रियअसल्याची माहिती दिली आहे. तौक्ते‘मुळे लक्षद्वीप क्षेत्र आणि या नजिकच्या दक्षिण-पूर्व आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रावर दबाव आला आहे.वाऱ्याचा वेग हा 150 ते 160 किलोमीटर ताशी राहील असेही म्हंटले आहे.. आणि याची गती आज वाढू शकते.अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात, तर उत्तर-पूर्वेकडील भागात 17 मे रोजी उंच लाटा वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि कर्नाटक येथे जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे वांद्रे-वरळी सी लिंक दोन दिवस बंद केला असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगतिले .तसेच पुढील 2 दिवस लोकांना मुंबईच्या समुद्रकिनार्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मच्छीमारांनाही आपली बोट समुद्रात न नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विविध समुद्रकिनार्यावर सुमारे 100 लाइफगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय अग्निशमन दल आणि NDRF ची टीमही सतर्क झाली आहे.मुंबईतील सर्व जंबो कोविड केंद्रे व इतर कोविड केंद्रे सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे.
सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येथील किनारपट्टी भागात असलेल्या 38 गावांमधील लोकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. किनारपट्टीच्या भागात होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी भागातील जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी विशेष दक्षता व चक्रीवादळासाठी तयार राहावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
18 तारखेला सकाळी गुजरात किनाऱ्यापर्यंत हे वादळ पोहोचणार असून गुजरातच्या किनारपट्टीला जोरदार वारे आणि प्रचंड पाऊस सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने केला आहे.