तौक्ते’चक्रीवादळाने आंब्याच्या एक हजार हेक्टरपेक्षा जास्त बागा उध्वस्तसिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गात तौकते चक्रीवादळामुळे अनेक बागांचे नुकसान झाले आहे. बागा उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. जवळ जवळ 3,375.16 हेक्टर क्षेत्रफळाच्या बागांना चक्रीवादळाने उद्धवस्त केले आहे.
सिंधुदुर्गातील 172 गावांच्या 1,059 बागा असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले आहे. एकट्या 1,110.42 हेक्टेयर क्षेत्रफळात आंब्याच्या बागांना नुकसान पोहोचले आहे. 277.61 हेक्टेयर क्षेत्रात आंबे चक्रीवादळामुळे पडले आहेत. तर 832 हेक्टर क्षेत्रात आंब्याच्या झाडांच्या फांद्या पडल्या.
रायगड जिल्ह्यामध्ये तक्रीवादळ ‘तौक्ते’ मुळे 4 लोकांचा मृत्यू झाला.जिल्हाधिकारी निधी चौधरींनीही तहसीलदारांना मृत व्यक्ती, मृत प्राण्यांसह इतर नुकसानीची लवकरात लवकर पंचनामा करुन रिपोर्ट देण्यास सांगितले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी उदय सामंत यांनी सांगितले की, मासेमारांसह आंबेआणि काजूसह इतर फळांनाही चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.या वादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आज कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत नुकसान भरपाईविषयी महत्त्वपूर्ण घोषणा होण्याचा अंदाज आहे.