दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांत निर्बंध भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 8,309 नवीन रुग्ण सापडले आहेत. ओमायक्रॉनं थैमान घातलेल्या दक्षिण आफ्रिकेतून गेल्या 20 दिवसांत 1000 प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यातच डोंबीवलीचा एक तरुण जो आफ्रिकेच्या केपटाऊनहुन निघाला होता तो दुबईमार्गे मुंबईत आला.त्याची RTPCRपॉझिटिव्ह आली .त्याच्यामध्ये कोरोनाचो कोणतीही लक्षणे नव्हती.रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्यानंतर त्याला नगर नियमाने विलगीकरण केले आहे. त्याशिवाय तो ज्या विमानातून आला आहेत त्यातील प्रवाश्याना ट्रेस करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
यासोबतच, 236 जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यातच जगभरात फोफावत असलेल्या ओमिक्रॉनचा धोका पाहता भारताने सोमवारी नव्या गाइडलाइन जारी केल्या. त्यानुसार ‘अॅट रिस्क’ अर्थात धोका असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच कोरोना टेस्ट होईल.