प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
मुंबई: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती 20 फेब्रुवारी रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात सादर करण्याचे परिपत्रक 14 फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे वतीने काढण्यात आले आहे. महाराष्ट पत्रकार संघाच्यावतीने या निर्णयाचे स्वागत करत राज्य शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने राष्ट्रपुरुष यांच्या व थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करण्या बाबत असलेल्या सूचीमध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची 20 फेब्रुवारी रोजी जयंती ही सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याचे परिपत्रक 14 फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आले असून. 31 डिसेंबर 2021 च्या परिपत्रका नुसार हे आदेश काढण्यात आल्याचे या मध्ये नमूद करण्यात आले आहे. हे इदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज. जि. वळवी यांचे स्वाक्षरीने काढण्यात आले आहे. दर्पणाकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शासकीय व निमशासकीय पातळीवर साजरी करण्याच्या या राज्य शासनाचे निर्णयाचे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले असून राज्य शासनाचे आभारही व्यक्त करण्यात आले आहेत


